किल्ल्याची ऊंची: ३८५० / Height of the Fort: 3850 ft.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररांग: डोंगररांग नाही / Fort Range: No
जिल्हा: पुणे / District: Pune
श्रेणी: मध्यम / Difficulty: Medium
या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे खासगी बस मध्ये प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण
आमच्यासोबत ट्रेक का?
या ट्रेक मधील नफा हा किल्ले संवर्धन व पर्यावरण संवर्धन याकार्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासोबत किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण करणे असा आपला मानस आहे. चला तर मग, एका adventure वर जाऊया!
मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवन मावळ प्रांतात असणार्या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपणं ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. द्रुतगती महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणार्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधारणत: या परिसरातील लेणी ही बौध्द आणि हिनयान पध्दतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.
इतिहास :
इ.स १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडा बद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये कोकणातील माहुली ,लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला. किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर इंग्रज व मराठे यांच्यात लढाई झाली. यात किल्ल्याचे बर्याच प्रमाणावर नुकसान झाले.आजमितिस किल्ल्याची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे.
सोबत काय घ्याल: एक दिवसीय ट्रेक / What You Should Carry: One Day Trek
पाण्याची बाटली (अत्यावश्यक) / Water Bottle (Important)
ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) / Identity Proof with a Passport Size Photo
टोपी / Cap
ट्रेकिंग बूट किंवा चांगली ग्रीप असेल असे बूट अत्यावश्यक / Sport Shoes with Good Grip
औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी / Essential Medicines
कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Snacks as Needed
पावसापासून आपले संरक्षण करणारे कपडे छत्री / रेनकोट / Raincoat
कपडे एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास / Extra Pair of Clothes 1 / 2 Pair as You Need
पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास / Extra Cash if You Wish to Buy Something
दिवा / मशाल (रात्रीच्या वेळी आवश्यक) / Torch, Good at Night
पेन आणि नोटबुक / Pen & Notebook
सुरक्षा साहित्य / Pocket Knife
आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- जितेंद्र शिंदे - +९१ ७४४७४४००६६
For any questions or queries, please contact Jitendra Shinde on +91 7447440066.