PURVA WELNESS ON WHEELS 2026
पूर्वा ग्रुप व रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन सोलापूर वतीने सलग दुसऱ्या वर्षी पूर्वा ग्रुप च्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली आयोजित करत आहोत.
पूर्वा ग्रुपचे संस्थापक व सर्वे सर्व श्री श्रीधर वडणाल सर यांनी मेडिकल होलसेल स्थापन करून सायकलवर स्वतः मेडिकल दुकानात औषध सप्लाय करत होते, सायकलिंग ची आवड पहिल्यापासूनच होती पण काळ अवघाताप्रमाणे कामाचा लोड वाढून बघता बघता पूर्वा नाव हे आता पूर्वा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हणून ओळखला जात आहे, या मध्ये त्यांची प्रचंड मेहनत व घरच्यांचा सपोर्ट यामुळे त्यांनी सोलापूर क्षेत्रामध्ये व हॉस्पिटल क्षेत्रामध्ये पूर्वा ग्रुपचे नाव उंचावले आहे.
श्रीधर वडणाल सर हे मागील वर्षी इव्हेंटच्या माध्यमातून रॉयल ला जोडले गेले सायकलिंगची आवड पहिल्यापासूनच असल्यामुळे त्यांनी रॉयल ग्रुप जॉईन करून आपली आवड व तंदुरुस्ती या दोन्हीचा मिलाप घडवून आणला. पूर्वा ग्रुप, ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याची काळजी घेतच असतो पण आता सायकलिंगच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य व तंदुरुस्ती याचा सुंदर मेळ घातला आहे म्हणूनच आम्ही या इव्हेंटला
PURVA WELNESS ON WHEELS 2026 हे सुयोग्य नाव ठेवले आहे.
यावर्षी इव्हेंट तर होणारच आहे पण त्याबरोबर लोकांमध्ये सायकलिंगची नियमित आवड निर्माण होण्यासाठी दिनांक 25 एप्रिल 26 एप्रिल आणि 27 एप्रिल (दुपारी बारापर्यंत) जो सायकल स्वार ( महिला 1 आणि पुरुष 1) सर्वात जास्त सायकलिंग करेल त्यांना 28 एप्रिल रोजी पूर्वा ग्रुप वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या रक्तदान शिबिर मध्ये दुपारी ठीक साडेअकरा वाजता एक छोटा कार्यक्रम घेऊन बुके व एक आकर्षक बक्षीस देण्यात येईल हो पण त्यात एक अट आहे की 26 एप्रिल रविवार ची रॅली तुम्ही पूर्ण करणे गरजेचे आहे, व तसेच तीन दिवसाचा डाटा तुम्ही स्ट्रावा लिंक सकट टोटल किलोमीटर सकट 27 तारखेला संध्याकाळी सहा वाजे पण ग्रुप वर सादर करणे आवश्यक आहे.
चला तर मग या नवीन उपक्रमासह सायकलिंगचा एक नवीन आयाम जोडूयात.
PARTICIPANTS WILL BE GET
A SUMMER KUL BEAUTIFUL CAP.
Hydration Support.
Fully loaded protein Pack Breakfast.
Fully Protein Loaded Pack Refreshments.
मार्ग - एकूण १५ किमी
पूर्वा मेडिकल, मार्कंडेय रुग्णालय समोर
|
भद्रावती पेठ
|
अक्कलकोट पाणी टाकी
|
SVS शाळा अक्कलकोट रोड
|
MIDC रोड एमआयडीसी पोलीस स्टेशन
|
चेतन हॉटेल आकाशवाणी केंद्राजवळ
| TURN
70 फूट रोड
|
गेंट्याल चौक
|
गुरुनानक चौक
| CP ऑफिस समोरून
सात रस्ता
|
भैय्या चौक ( HYDRATION POINT)
| पाणी बॉटल, चिक्की, ORS LIQ
|
बस स्टॅन्ड
|
बाळीवेस
|
कन्ना चौक
|
राजेंद्र चौक
|
जोड बसवना चौक
| Turn
पूर्वा मेडिकल मार्कंडे रुग्णालय समोर.
रॅली समाप्त.
नियम व अटी
1- वाहतुकीचे नियम पाळून सर्वांनी सुरक्षितपणे सायकलिंग करावे.
2- संयोजकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
3,- हेल्मेट परिधान करून येणे
4- रॅलीमध्ये दोन सायकल स्वार एकत्र येऊन दोनच्या लाईनीने जाणे, मागेपुढे होऊ नये
5- पूर्वा ग्रुप व रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशन, सोलापूर हे फक्त आयोजन करते असून सहभागी सदस्यांनी स्व-जबाबदारीवर सायकलिंग करणे.
6- आमचा उद्देश प्रदूषण विरहित सायकलिंग करून तंदुरुस्ती व हृदय मजबूत करून सोलापुरात सायकलिंग चळवळ तयार करणे
7 - सायकल स्वार नि सोबत पाण्याची बॉटल, जरुरीचे औषध बरोबर ठेवावीत.

