Romancing with Customer | Event in Kolhapur | Townscript
Romancing with Customer | Event in Kolhapur | Townscript

Romancing with Customer

May 25 '19 | 08:30 AM (IST)

Event Information

पुणे येथील विक्रमी प्रतिसादानंतर, कोल्हापूर येथे प्रथमच प्रख्यात व्यवसाय विकास प्रशिक्षक श्री समाधान सन्नके यांची  "ROMANCING WITH CUSTOMER" ही एक जबरदस्त कार्यशाळा स्टेप अप ग्रुप संयुक्त मानाने आयोजित करत आहोत.


कधी आणि कुठे :
दिनांक : 26 मे 2019 रविवार
वेळ : सकाळी 8.30 ते सायं 6.00 पर्यंत.
स्थळ : हॉटेल सयाजी, कोल्हापूर



"Romancing with Customer" बद्दल थोडेसे :

कोणत्याही व्यवसायाचा प्रमुख हेतू असतो 'ग्राहक मिळवणे आणि तो टिकवून ठेवणे. ग्राहक मिळवून तो टिकवून ठेवल्यामुळेच व्यवसायाला नफा प्राप्त होतो. जो व्यवसाय जास्तीतजास्त ग्राहक मिळवतो व त्या ग्राहकांना टिकवून ठेवतो तो व्यवसाय प्रचंड यशस्वी बनतो व भरपूर नफा देखील प्राप्त करतो. आपण मिळवलेले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करण्यासाठी महत्त्वाच्या संकल्पना, टूल्स व स्ट्रॅटजी शिकवणारी एक जबरदस्त कार्यशाळा म्हणजेच "Romancing With Customer"



 "Romancing With Customer" या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?

✔ ग्राहकाला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक मानसिकता
✔ नवीन, आधुनिक व परिणामकारक कृतीयोजना (SERVICE Sales Model)
✔ आपल्या ग्राहकांना परिणामकारकपणे हाताळण्याचे तंत्र.
✔ आपल्या ग्राहकाला वारंवार फोन करुन त्याची अडचण दूर करण्याच्या युक्त्या.
✔ आपल्या ग्राहकाला भेटीच्या सुरुवातीपासूनच कसे प्रभावीत करावे.
✔ ग्राहकाच्या गरजा विशिष्ट प्रक्रियेद्वारे समजून घेणे.
✔ ग्राहकाला फक्त उत्पादन विकण्यापेक्षा त्याच्या अडचणींवर उत्पादनाच्या माध्यमातून उपाय पुरवणे.
✔ ग्राहकावर प्रभावीपणे छाप पाडणे.
✔ आपले उत्पादन व सेवा योग्यप्रकारे ग्राहकासमोर मांडणे.
✔ आपल्या ग्राहकाला नेहमी ब्रँडेड अनुभव देणे.
✔ विक्री प्रक्रिया कमीतकमी वेळेत पूर्ण करून जास्तीत जास्त फोकस सर्व्हिस वर करणे.
✔ जर एखाद्या क्षणी आपला ग्राहक नाराज झाला तर त्याची रिकव्हरी करणे.
✔ जास्तीतजास्त ग्राहक मिळवण्यासाठी भरपूर टूल्स्, तंत्र व कृतीयोजना.



 ही कार्यशाळा कोणासाठी :
✔ उद्योजक 
✔ सेल्स एक्सेक्युटीव्ह, मॅनेजर
✔ प्रोफेशनल्स्,स्वंयरोजगारकर्ते
✔ विमा एजंट, नेटवर्कर्स



प्रशिक्षक : समाधान सन्नके

प्रशिक्षकांविषयी
आपल्या 500 पेक्षा जास्त कार्यशाळेतून जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणणारे "श्री समाधान सन्नके" ज्यांचे ध्येयच प्रत्येक माणसामध्ये प्रचंड उर्जा भरणे हे आहे.
ते स्वतः गोल्डन ग्रुप ऑफ कंपनी या संस्थेचे संचालक असून गोल्डन ग्रुप मरिन सर्व्हिसेस, रियल इस्टेट, स्टुडंन्ट डेव्हलपमेंट, ट्रेनिंग आणि HR सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे.
श्री समाधान सन्नके यांच्याकडे सेलिंग आणि कस्टमर फिल्ड मध्ये गेल्या 10 वर्षांचा अनुभव आहे. ते स्वतः एक ग्राउंड लेव्हल चे प्रशिक्षक असून त्यांच्याकडे सेल्स या विषयावर असणाऱ्या प्रभावी कौशल्यांमुळे आजपर्यंत कितीतरी लोकांना त्याचा प्रचंड फायदा झाला। आहे.



 प्रवेशिका मिळवण्यासाठी संपर्क : 
9137089897 / 9773779205
आयोजक : स्टेप अप ग्रुप

Venue

Sayaji Hotel, Kolhapur
E Ward, Old Pune-Bangalore Highway, Kawala Naka, Shahupuri, Kolhapur, India
Step Up Group cover image
Step Up Group profile image
Step Up Group
Joined on Mar 14, 2019
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more