हल्ली बर्याच महिला खासगी उद्योग व व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असतात, त्यांना व्यवसायात सुरुवातीस येणाऱ्या आव्हानांबद्दल पूर्ण माहिती नसते. महिलांसाठी सरकारकडून देण्यात येणार्या योजनांची देखील महिला उद्योजकांना पूर्ण कल्पना नसते. तसेच वस्तूंची/ मालाची निर्मिती करणे व मार्केटिंग करणे ही दोन्ही आव्हानांना देखील सामोरे जावे लागते. सोबतच `क्वॉलिटी’ही जपावी लागते. या अनुषंगाने महिलांचा औद्योगिक विकास करण्याच्या उद्देशाने महिला उद्योजीकांकरीता विस्डम एक्स्ट्रा तर्फे राबविण्यात येणार्या “स्वयंशक्ती” ह्या उपक्रमांतर्गत व इनरव्हील – GENNEXT च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “स्वयंशक्ती – सबला” हा महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ह्या मेळाव्याचे प्रमुख अतिथी – श्री. प्रवीण देशमुख, उद्योग सह संचालक, नाशिक व विशेष अतिथी – श्री. श्रीमंत माने, संपादक, सकाळ, नाशिक हे उपस्थित असतील. तसेच प्रमुख वक्ता – श्री. प्रदीप पेशकार, अध्यक्ष, भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र हे उपस्थित असतील.
बऱयाच महिलांना स्वतःचा काही तरी व्यवसाय-उद्योग सुरू करावा, असे वाटते. उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल कुठून आणायचे हा मुख्य प्रश्न नव्याने उद्योजक बनू पाहणाऱयांना भेडसावतो. शासनाच्या विविध योजनांची व महिलांसाठी उपलब्ध असलेल्या अनेक औद्योगिक संधीची माहिती ह्या व्याख्यानात दिली जाईल. स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिने सरकारच्या विविध विभागांतर्गत असलेल्या महामंडळामार्फत स्वयंरोजगार इच्छुक महिलांना स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहन तसेच, कर्जाची माहिती ह्या व्याख्यानात दिली जाईल. राज्यातील बेरोजगारीची तिव्रता कमी करण्यासाठी तसेच महिला उद्योजिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने विविध प्रकारच्या स्वयंरोजगार योजना सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनांची पारदर्शी आणि प्रभावी अंमलबजावणी होऊन महिलांना स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्धता सुलभ व जलद होण्याकरीता सरकारच्या योजनांवर चर्चा केली जाईल.
हा मेळावा दि. ०७/०१/२०१८ रोजी दु. ४:०० ते सा. ६:०० पर्यंत नाईस संकुल, आयटीआय सर्कल, सातपूर, नाशिक येथे फक्त महिलांसाठी आयोजित केला आहे. प्रवेश विनामूल्य असून आवश्यक नाव नोंदणी ९५७९९३२४७६ नंबरवर SMS द्वारे करावी.
महिलांसाठी आयोजित ह्या सुवर्ण संधीचा नाशिक स्थित सर्व इच्छुक महिला व उद्योजिकांनी लाभ घ्यावा

