NLP म्हणजे काय
NLP म्हणजेच जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त असणारे सेल्फ डेव्हलपमेंट क्षेत्रातील एक असे अध्ययावत प्रशिक्षण जे आपल्याला आपल्या स्वतःची च जाणीव एका वेगळ्या अंगाने घडवून देते
कोणतंही यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारे विचार आपल्या मेंदूसोबत कसे आणि कुठे जोडलेले असतात हे समजून घेऊन त्याचप्रमाणे वागणे, त्याचप्रमाणे बोलणे आणि समोर आलेल्या कोणत्याही गोष्टीस त्याचप्रमाणे रिऍक्ट होणे म्हणजेच NLP चा वापर करणे. थोडक्यात काय तर NLP म्हणजे आपल्या CONSCIOUS आणि UNONSCIOUS MIND यांची कार्यं कशी चालतात हे जाणून घेऊन त्या पद्धतीने वागणं आणि बोलणं म्हणजेच भाषेचा वापर करून आपल्या न्युरोलॉजिकल सिस्टीम मधले प्रोग्रामिंग बदलणं जे मला आत्तापर्यंत यशस्वी होण्यापासून थांबवत होतं किंवा मला यश मिळवण्यासाठी खूप जास्त वेळ लावत होतं. खरंतर NLP हे मुळात एक विज्ञान आहे आणि ही एक कलासुद्धा आहे. जसं कि आपण नेहमी वेगवेगळया क्षेत्रांतली यशस्वी लोक पाहत असतो किंवा त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणजे "NLP" हाच अभ्यास करतं की ही सर्व माणसं नक्की यशस्वी कशी काय झाली..? त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, हुशारीमुळे की इतर कशामुळे?