ANLP-India Certified NLP Practitioner 6 Day's Residential Training Program | Event in Pune | Townscript
ANLP-India Certified NLP Practitioner 6 Day's Residential Training Program | Event in Pune | Townscript

ANLP-India Certified NLP Practitioner 6 Day's Residential Training Program

May 28 '19 - Jun 01 '19 | 09:00 AM (IST)

Event Information

आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त असणारे सेल्फ डेव्हलपमेंट क्षेत्रातील अध्ययावत प्रशिक्षण म्हणजेच NLP.


6 दिवसीय निवासी "Certified NLP Practitioner" प्रशिक्षणक्रम.


कधी :
तारीख : 28, 29, 30, 31 मे आणि 1 व 2 जून.
(मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार शनिवार आणि रविवार.)


 वेळ :
सकाळी 9 ते सायंकाळी 6


कुठे :
स्थळ : मिंत्रा रिसोर्ट, पुणे सातारा रोड, भोर, पूणे.




NLP म्हणजे काय ?

NLP म्हणजेच जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त असणारे सेल्फ डेव्हलपमेंट क्षेत्रातील एक असे अध्ययावत प्रशिक्षण जे आपल्याला आपल्या स्वतःची च जाणीव एका वेगळ्या अंगाने घडवून देते.
कोणतंही यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारे विचार आपल्या मेंदूसोबत कसे आणि कुठे जोडलेले असतात हे समजून घेऊन त्याचप्रमाणे वागणे, त्याचप्रमाणे बोलणे आणि समोर आलेल्या कोणत्याही गोष्टीस त्याचप्रमाणे रिऍक्ट होणे म्हणजेच NLP चा वापर करणे. थोडक्यात काय तर NLP म्हणजे आपल्या CONSCIOUS आणि UNONSCIOUS MIND यांची कार्यं कशी चालतात हे जाणून घेऊन त्या पद्धतीने वागणं आणि बोलणं म्हणजेच भाषेचा वापर करून आपल्या न्युरोलॉजिकल सिस्टीम मधले प्रोग्रामिंग बदलणं जे मला आत्तापर्यंत यशस्वी होण्यापासून थांबवत होतं किंवा मला यश मिळवण्यासाठी खूप जास्त वेळ लावत होतं. खरंतर NLP हे मुळात एक विज्ञान आहे आणि ही एक कलासुद्धा आहे. जसं कि आपण नेहमी वेगवेगळया क्षेत्रांतली यशस्वी लोक पाहत असतो किंवा त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणजे "NLP" हाच अभ्यास करतं की ही सर्व माणसं नक्की यशस्वी कशी काय झाली..? त्यांच्या  बुद्धिमत्तेमुळे, हुशारीमुळे की इतर कशामुळे..?





Neuro Linguistic Programming म्हणजे नक्की काय ?

➡ न्युरो : या शब्दाचा अर्थ म्हणजेच आपल्या अंगात, प्रामुख्याने मेंदू आणि शरीरभर पसरलेल्या शीरा, म्हणजेच आपली 'न्युरोलॉजिकल सिस्टीम'

➡ लिंग्विस्टिक : या शब्दाचा अर्थ म्हणजेच  आपण वापरत असलेल्या विविध भाषा मग ती मराठी, हिंदी अथवा इंग्रजी असो किंवा आपले स्वर / हातवारे आणि आपल्या हावभावाची भाषा ज्यांच्या वापराने आपण आपलं जग रचतो आणि स्वत:शी आणि इतरांशी संवाद साधतो.

➡ प्रोग्रामिंग : म्हणजेच आपल्या मनात आणि ह्रदयात लहानपणापासूनच्या एकजूट झालेल्या शिकवणी. मग त्या चांगल्या असो किंवा वाईट आणि त्या एकत्रित येऊन, आपण जे नकळत म्हणजेच अजाणतेपणी आपोआप करतो ते म्हणजेच आपलं ""प्रोग्रामिंग""





NLP चा वापर केल्याने आपल्याला काय मिळेल :

◾ स्वत:वर आणि नशिबावर नियंत्रण.
◾ भेदक आणि प्रभावशाली कम्युनिकेशन.
◾ वैयिक्तक आणि व्यावसायिक आयुष्यात जास्त प्रभावीपणा.
◾ समोरची व्यक्ती कसा विचार करते आहे हे समजायला.
◾ माणसा-माणसांमधील परस्पर संबंध बळकट आणि अजून फायदेशीर करायला.
◾ इंटरव्ह्यू किंवा महत्त्वाच्या मीटिंगला जाताना इन्स्टंट कॉन्फिडन्स आणायला.
◾ राग कमी करून डोकं शांत ठेवायला.
◾ स्वत:बद्दलचे निकामी विश्वास आणि नको असलेल्या वागणुकी घालवायला.
◾ साध्य करता येतील अशी स्पष्ट आणि सुनिश्चित लक्ष्यं समोर ठेवून साकार करायला.
◾ पटकन आणि सोप्या तर्‍हेने स्वयंप्रेरित व्हायला.
◾ स्वत: आणि इतरांमधील भीती आणि फोबिया घालवायला.
◾ इतरांना प्रेरणा देण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं कौशल्य वाढवायला.
◾ ज्या गोष्टी आपल्याला आवडतात पण आपल्यासाठी वाईट आहेत, त्या गोष्टींपासून मुक्त व्हायला.
◾ ते गुण आणि कौशल्य जे आपल्याला इतरांमध्ये आवडतात ते स्वत: मध्ये बाणवायला.





NLP कोणासाठी :
तो प्रत्येकजण ज्यांचा माणसाशी, मनाशी आणि यशाशी संबंध येतो. अशाच लोकांसाठी भारतातील पहिले "NLP MASTER TRAINER श्री. उमेश सोमण सर..... "स्टेप अप ग्रुप" च्या संयुक्त मानाने घेऊन येत आहेत "'CERTIFIED NLP PRACTITIONER" हा 5 दिवसीय निवासी प्रशिक्षणक्रम.






प्रशिक्षकांविषयी

आपल्या 1300 पेक्षा जास्त कार्यशाळेतून जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणणारे उमेश सोमण सर, ज्यांचे ध्येयच प्रत्येक माणसामध्ये प्रचंड उर्जा भरणे हे आहे.
उमेश सोमण हे न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आंतरराष्ट्रीय प्रमाणित प्रॅक्टिशनर, मास्टर प्रॅक्टिशनर, ट्रेनर आणि मास्टर ट्रेनर आहेत.
उमेश सोमण हे जगातील पहिले आणि एकमेव असे ट्रेनर आहेत जे मान्यताप्राप्त एन. एल. पी. चे सर्टिफिकेशन आणि त्याचे प्रशिक्षण हे शुद्ध मराठी भाषेमधून देतात.
विशेष म्हणजे ANLP India या जागतिक अग्रेसर संस्थेचे ते भारतातील एकमेव आणि पहिले भारतीय मास्टर ट्रेनर आहेत.



मित्रांनो जर "N.L.P." सारखा इतका गहन विषय आपल्याला आपल्या मातृभाषेत शिकायला मिळत असेल तर यापेक्षा दुसरी सुवर्णसंधी नाही.




तुमची जागा आरक्षित करण्यासाठी तात्काळ संपर्क करा.
अजित ओंबळे
9773779205
9594810310

Venue

Mantra Resort
Karandi, Bhor, Pune, India
Step Up Group cover image
Step Up Group profile image
Step Up Group
Joined on Mar 14, 2019
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more