ACS CYCLOTHON 2025.
ACS हॉस्पिटल, हे भैया चौक या मध्यवर्ती ठिकाणावर अद्यावत हृदयविकार उपचार केंद्र असून चार निष्णात हृदयतज्ञ डॉक्टर मित्रांनी, आधुनिक तंत्रज्ञान व करुणामय, रुग्ण_ केंद्रित सेवांचा संगम साधत हॉस्पिटल सुरू केले आहे.
डॉक्टर राहुल कारीमुंगी, डॉक्टर सिद्धांत गांधी, डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर दीपक गायकवाड या चार मित्रांनी कार्डिओलॉजी क्षेत्रातले पहिले उच्च दर्जाचे, नैतिक व तंत्रज्ञान आधारित हृदय विकास सेवा पुरवणारे केंद्र सोलापुरात चालू केले.
सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच AI चा वापर करून तीन जटील हृदय शस्त्रक्रिया ACS टीमने यशस्वीरित्या पार पाडल्या, याबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे कौतुक होत आहे .
ACS टीमने तंदुरुस्ती हाच दृष्टिकोन समोर ठेवून जागतिक हृदय दिनाचे ( 29 सप्टेंबर 2025) औचित्य साधून ACS CYCLTHON 2025 आयोजित केले आहे, जेणेकरून सायकलिंग द्वारे आपले शरीर स्वस्थ, तंदुरुस्त, राहील याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष वेधले आहे.
ACS व रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य असा आरोग्य संवर्धन, प्रदूषण विरहित सायकलिंग रॅली आयोजित केली आहे.
रॅली चा मार्ग -
ACS हॉस्पिटल _ भैय्या चौक_ छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅन्ड_ बाळीवेस _ मधला मारुती __ TURN __ आजोबा गणपती रस्ता__ जिल्हा परिषद___ रंग भवन__ TURN ___ हरीभाई देवकरण शाळा मार्गे डफरीन चौक __ महापौर निवास समोरून गांधी पुतळा रेल्वे स्टेशन ___ भैय्या चौक___ TURN ___ रामलाल चौक __ U TURN ___ ACS हॉस्पिटल.
सहभागी सायकल स्वारास -
• टी-शर्ट
• रॅली पूर्ण केल्याबद्दल सहभागी प्रमाणपत्र
• सायकल ला समोर लावण्यासाठी बॅनर
• चहा
• नाष्टा
• ॲम्बुलन्स व्यवस्था
(सहभागी सायकल स्वारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर सायकलिंग करणे, आम्ही फक्त आयोजन करत आहोत.)
कार्यक्रम
दिनांक - 28 सप्टेंबर 2025
वार - रविवार
वेळ - सकाळी ठीक 5.30 वाजता
ठिकाण - ACS हॉस्पिटल, भैय्या चौक, सोलापूर ( https://maps.app.goo.gl/Z6kCVLafNBkGVLRH6 )
अधिक माहितीसाठी संपर्क
अभिनय भावठाणकर
मोबाईल नंबर - 9890628533
E mail - royalriderscyclingassociations@gmail.com

