झपूर्झा हसले मनी चांदणे 2021. ठाण्यातील अजेय संस्था वर्षांतून एकदा झपूर्झा नावाचा theater इव्हेंट करते. झपूर्झा चे हे 9 वे वर्ष आहे. संकल्पना, लेखन, दिग्दर्शन डॉ.क्षितिज कुलकर्णी यांचे असून निर्माता गौरव संभुस करत आहेत. एका थीम ला धरून वेगवेगळे नाट्यविष्कार सादर होतात. गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने झपूर्झा झाला या वर्षी mix media theater अंतर्गत झपूर्झा - हसले मनी चांदणे 2021 आपल्या समोर सादर होणार आहे.