Historic 555 km run experience by Ashish Kasodekar | Event in Pune | Townscript
Historic 555 km run experience by Ashish Kasodekar | Event in Pune | Townscript

Historic 555 km run experience by Ashish Kasodekar

Sep 08 '19 | 10:00 AM (IST)

Event Information

ला अल्ट्रा ५५५ कि. मी.मॅरेथॉन ही जगातली एक खूपच भयानक आणि क्रूर रेस म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यामध्ये स्पर्धक ५५५ किलोमीटर चे अंतर जे जगातील सर्वात उंच पाच खिंडीतून, साडे पाच दिवसात पूर्ण करतात.यामुळेच १७ ते २३ ऑगस्ट २०१९ ला आयोजित केलेली ही स्पर्धा एकदम ऐतिहासिक ठरली. पुण्याचा आशिष कासोदेकर ही स्पर्धा ६ तास अगोदर म्हणजेच केवळ १२६ तासांत खूपच रोमांचकारक पद्धतीने पूर्ण केली.

आशिषचा अशक्यप्राय अनुभव ऐकण्याकरता बघण्याकरता त्याच्या मित्रांनी ८ सप्टेंबरला कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यात सुनंदन लेले त्याची मनमोकळी मुलाखत घेणार आहे. कार्यक्रमात आशिष निवडक फोटो आणि काही व्हिडिओ क्लिप्स सादर करणार आहे.

ला अल्ट्रा शर्यत पूर्ण करण्याकरता आशिषला मोठा खर्च आला आहे जो अजूनही भरून निघालेला नाही . म्हणून सदरच्या कार्यक्रमातून आशीषची कमाल कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा खर्च भरून काढणे असे दोनच उद्दीष्ट्य आहेत.

५५५ किलोमीटरची कठीण शर्यत जिद्दीने पूर्ण करणाऱ्या आशिष ला मानवंदना द्यायला प्रत्येकाने रुपये ५५५ जमा करून क्रीडाप्रेमींनी कार्यक्रमाला हजर राहावे अशी विनंती त्याचे मित्र करत आहेत. विद्यार्थ्यांकरिता फक्त रुपये १०० भरून कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.

हॉल छोटा असल्याने फक्त १३० क्रीडाप्रेमी आणि फक्त ७० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे . तेंव्हा ज्यांना ह्या कार्यक्रमाला यायचे आहे त्यांनी कृपया

Arvind Bijve 93700 15930
Venky Kashelikar 98230 40962

ह्यांना फोन करून आपली जागा पक्की करावी हि विनंती .

तारीख : रविवार ८ सप्टेंबर २०१९

वेळ : सकाळी १० वाजता

स्थळ : बालशिक्षण हॉल ,मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे

Venue

Balshikshan Hall
Mayuri Colony,Off Karve Road,Kothrud, Pune
Friends of Ultra Running cover image
Friends of Ultra Running profile image
Friends of Ultra Running
Joined on Feb 7, 2017
About
undefined
Have a question?
Send your queries to the event organizer
Friends of Ultra Running profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Friends of Ultra Running profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more